It is a Very good Programe. I haven't seen these type of programe yet. But, this is a very, very good example of Indian Culture. I proud of these.

- Khushnood Dakhani
"The whole aura of the dance performer and their performance took me to a different world altogether; the mystic and divine world of pure art"

- Saurabh Parmar
प्रगती अकादमी नृत्याचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होता. "कला हे जीवनाचे तत्व आहे. कलेमुळेच माणूस आपले जीवन आनंदाने घालवू शकतो. कलेचा विकास व असे कार्यक्रम हे सतत होवोत. आपल्या कार्याला शुभेच्छा !!!

- सौ. वाडेकर
आजच्या या कार्यक्रमाने मन, हृदय तृप्त झाले. अशा कार्यक्रमांची मेजवानी वारंवार आवडेल. कला हीच ईश्वरसेवा, तादात्म्यता, तल्लीनता ! सर्व भाव मनात साठून आले. अजूनही खूप काही आहे. शब्द नाहीत. अंत:करणापासून खूप खूप शुभेच्छा!!!

- सौ. जोशी
अप्रतिम वारंवार नाशिक मध्ये असे कार्यक्रम व्हावेत हीच एकमेव इच्छा !!!

-अरविंद
उत्कृष्ट नृत्याचा अविष्कार बघून डोळ्याचे पारणे फिटले . संपूर्ण कार्यक्रम डोळ्यात व हृदयात साठवून सभागृहाचा निरोप घेतला .

-जे .बी .देवदास
आजचा कार्यक्रम खूप छान, सुरेख, मधुर, मनमोहक व मंत्रमुक्ध करणारा ठरला . असा कार्यक्रम या आधी कधीच पहिला नव्हता. असा कार्यक्रम पुन्हा पुन्हा भरवावा . अवश्य बघायला आवडेल व अवश्य येईन .

-सौ . भागिरथी बुधले
श्रीशैल: नितीन: बुधले इति मम नामधेयंम | स: कार्यक्रम: मम अतिव रोचते | नृत्यंम इति भारतवर्षस्य , भारतदेशस्य संस्कृती भवति | स: कार्यक्रम अतिव सुमधुरम मंत्र्मुग्धम च अभवत | भगवान शिव: मम इष्ट देवता आस्ति | नववर्षंम नवहर्षम ददातू | नववर्षंम संस्कृतीपूर्णंम सुखसमाधानंम च ददातू | इति मम शुभेछा |

-श्रीशैल: नितीन: बुधले:
पहिल्यांदा हा नृत्यप्रकार बघितला कार्यक्रम भरपूर आखिव, रेखीव पद्धतीने कलेने नटलेला आणि भारतीय संस्कृतीतील परंपरागत संस्कृतीचे दर्शन घडविणारा वाटला . अशा कार्यक्रमांचे आयोजन करणेकरिता आम्हा उत्साही प्रेषक वर्गाकडून नेहमीच धन्यवाद !

- डॉ.सुप्रिया व भाग्यश्री
अप्रतिम सुंदर कलेचा आविश्कार. आपले शत शत धन्यवाद .

-(जान्हवी) गणेश देशपांडे
माझ्या आयुष्यातील सर्वात अप्रतिम नृत्यदर्शन, मी भारावून गेले, इतके की मला शब्द सापडत नाही आहेत. पेन हाताबरोबर कापतो आहे.

-जाई
सर्वच कार्यक्रम खूपच सुंदर झाला. आपल्या पुढील वाटचालीच हार्दिक शुभेछा.

- वाय. एस . नांदुर्डीकर
भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्याचा आविष्कार पाहून मन एकदम मंत्रमुग्ध झाले या नृत्याची ओळख पटली. अशा प्रकारे प्रगती २०११ यांनी कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल धन्यवाद !!!

- सौ. प्रे. दि. चव्हाण
कार्यक्रम उत्तम झाला सर्व सादरीकरणात अतिशय मेहनत घेतलेली दिसली. आपले स्वताचे सादरीकरण उत्तमच होते. वैभव सरांचे सादरीकरण बरेच दिवसांनी बघायला मिळाले .

- रवींद्र .अ. नेडेकर
">sdfdsf

Hacked By Angel Priya <3

कार्यक्रम अतिशयच अप्रतिम होता. मलाही भरतनाट्यम हि नृत्यशैली खूपच आवडते व या कार्यक्रमातून मला ती शिकण्याची इच्छा झाली व प्रेरणा मिळाली त्या बद्दल धन्यवाद !

- ऋतुजा जोशी